जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामास लवकरच सुरुवात होत आहे. या हंगामासाठी बीयाणे खरेदी करतांना शेतकरी बांधवानी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
तकऱ्यांनी बीयाणे खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातुनच बियाणे खरेदी करावे. बियाण्याची अंतिम मुदत पाहुनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टण/ पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपुन ठेवावे. कोणत्याही खाजगी व्यक्तीकडून बियाणे खरेदी करु नये व आमिषाला बळी पडू नये. खरेदी करीत असलेल्या बियाणे पाकिटावरील मजकुर व लॉट क्रमांक इत्यादी बरोबर असल्याची खात्री करावी. कमी वजनाची निविष्ठा/छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा इतर तक्रारींसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.