बीबा नगरातील प्रौढाचा अकस्मात मृत्यू; तालुका पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरतील बीबा नगरातील ४८ वर्षी गृहस्थाचा दिड देान महिन्यापुर्वी अपघात झाला होता. अपघातांनतर उपचार पुर्ण होवुन घरी आराम करत असतांना त्यांना पक्षवाताचा झटका आल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अजय पांडूरंग रावतकर (वय-४८) असे मयताचे नाव आहे. तालुक्यातील सावखेडा शिवारातील बिबा नगर परिसरातील रहिवासी अजय पांडूरंग रावतकर (वय-४८) यांचा दिड दोन महिन्यांपुर्वीच अपघात झाला होता. रुग्णालयात प्रदिर्घ उपचार घेतल्यानंतर ते, नुकतेच घरी परतले असतांना त्यांना पक्षवाताचा झटका आल्याने मंगळवार (ता.२) रोजी कुटूंबीयांनी रुग्णालयात हलवले, मात्र तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु  ओढवला होता.  रात्री दहा वाजेच्या सुमारास जिल्‍हा सामान्य रुग्णालयात मयत स्थितीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यास मयत घोषीत केले असून तालूका पेलिसांत अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक सतीष हाळणोर करत आहेत.

Protected Content