मुंबई (वृत्तसंस्था) शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांच्या महाराष्ट्रात परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यापाऱ्याला झालेली मारहाण ही छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली आहे, अशी टीका माजी मंत्री पंकजा यांनी बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली गुंडगिरी कॅमेरात कैद झाली. गाड्यांची तोडफोड करुन एका व्यापाऱ्याला मारहाण करणारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी दिला. पण, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केली आहे. परळीत पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ मिळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, परळीच्या माजी आमदार पंकजा यांनी ट्विट करून धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 18, 2020