बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी ।  शहरातील भारत दूर संचार विभागाच्या कार्यालयात बीएसएनएलच्या विविध संघटनांतर्फे शासनाच्या भारत दूरसंचार विभागाच्या धोरणांविरोधात तसेच महागाई भत्ता, पे रिव्हीजन, तसेच भारत दूरसंचार विभागाला फोर जी मिळावे यासह विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.

देशभरात बीएसएनएल मधील अधिकारी व कर्मचारी संघटनातर्फे गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. याबाबत कामगार संघटनेचे निलेश काळे यांनी बोलतांना सांगितले, केंद्र शासनाच्या विविध विभागांतर्फे कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून भारत दूर संचार विभागाच्या विविध संघटनांतर्फे भारत दूर संचार विभागाच्या कार्यालयात एक दिवसीय संप करण्यात येत आहे. या आंदोलनात ऑल इंडिया बीएसएनएल डॉट पेन्शनर्स असो िएशन, बीएसएनएल एम्प्लॉईज युनीयन यांच्यासह विविध कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले, तसेच शासकीय भत्ते लवकरात लवकर अदा करण्यात यावी, महागाई भत्त्यांबाबत शासनाचा नवीन अध्यादेश रद्द करण्यात यावा, पेन्शन रिव्हीजन १ जानेवारी २०१७ पासून लागू करण्यात यावा, बीएसएनएला अद्याही फोर जी सेवा सुरू करत आलेली नाही, रियालन्स जिओसाठी भारत दूर संचार विभागाचा मोदी सरकारने विश्‍वासघात केला आहे. वैद्यकीय बिले प्रलंबित असलयाने बीएसएनएल एमआरएस अंतर्गत कर्मचारी कॅशलेस उपचार घेवू शकत नाही. कंत्राटी कामगारांना १५ महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही यासह विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आले. यावेळी आंदोलनात संघटनेचे सचिव निलेश काळे, ऑल इंडिया बीएसएनएल डॉट पेन्शनर्सचे सचिव सी.डी. पाटील, जिल्हाध्यक्ष एम.डी.बढे, शशीकांत सोनवणे, सुदाम ठाकूर आदी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/404136290785748/

 

Protected Content