भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमध्ये शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
बियाणी स्कुलमध्ये शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सेक्रेटरी संगीता बियाणी ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी प्रिंसीपल डी. एम. पाटील,प्रिंसीपल कामना पराशर, प्रिंसीपल सोफीया फ्रान्सीस यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. मनस्वी सपकाळे,अनम फातिमा खान यांनी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व उत्साह वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. दहावीची विद्यार्थिनी गुंजन चौधरी, रितू सदाशिव पाटील यांनी आपल्या शाळेविषयीच्या भावना,शालेय जीवनाच्या भावना व्यक्त केल्या. संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन, पेपर सोडवण्याबाबत सूचना तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन यशाची परंपरा कायम ठेवा असा सल्ला दिला.