नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बाहेरचे लोक इथे येऊन गोंधळ घालू शकतात, त्यामुळे दिल्लीच्या सर्व सीमा बंद करव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. बाहेरच्या राज्यातून लोक दिल्लीमध्ये येत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या सीमा बंद करण्याची गरज असून खबरदारी म्हणून काही जणांना अटक करण्याची आवश्यकता आहे, असे केजरीवाल म्हणाले. तसेच तणावग्रस्त भागामध्ये मी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलिसांसह शांतता मार्च काढण्याचे आवाहन केले आहे” असे केजरीवाल यांनी सांगितले. आतापर्यंत दिल्ली पोलीस दलातील एका शिपायासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस फोर्सची कमतरता असून, वरिष्ठांकडून आदेश येईपर्यंत ते कारवाई करु शकत नाहीत, असे हिंसाचाराग्रस्त भागातील आमदारांनी सांगितल्याचेही केजरीवाल म्हटले.