कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तुषार पाटील बिनविरोध

nivad

यावल, प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजप व काँग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेचे जळगाव जिल्हा उपप्रमुख तुषार सांडुसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दिनांक २५ फेब्रूवारी रोजी सकाळी ११ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक् के .पी . पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे तुषार सांडूसिग पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते सेनेचेच सभापती भानुदास चोपडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या सभापतीपदावर तुषार पाटील यांची बिनविरोध करण्यात आली. या बैठकीस माजी सभापती हिरालाल व्यकंट चौधरी , माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी, माजी सभापती पांडुरंग दगडु सराफ, विद्यमान उपसभापती योगराज डिगंबर बऱ्हाटे ,संचालीका अरूणा रामदास पाटील , कांचन ताराचंद फालक , संचालक उमेश प्रभाकर पाटील, डॉ. नरेन्द्र वामन कोल्हे ,सतार सुभान तडवी, अशोक चौधरी, सुनिल बारी, पुंजो पाटील, विनोद पाटील , उमेश बेंडाळे हे संचालक उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुषार पाटील यांची बिनविरोध होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतीषबाजी करून आंनद व्यक्त केला. सर्व उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तुषार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटी , माजी आमदार व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे विशेष आभार मानले .

Protected Content