मुंबई (वृत्तसंस्था) स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही, अशा कडवट शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली आहे.
वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?,’ असा सवाल शिवसेनेने आपल्या सामनाच्या संपादकीयमधून केला होता. त्यावर राणे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे. बाळासाहेब होते का स्वतंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवली केली. बाळासाहेबांचा तो इतिहास लोकं विसरलेली नाही, अशा आशयाचे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही. https://t.co/eUq04Bvxll
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 27, 2020