मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या ५१ नेत्यांना वाढीव सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह ४० आमदार आणि १० खासदार आले होते. यासोबत विधानपरिषदेतील एक आमदारही त्यांच्यासोबत आल्याने आमदारांची एकूण संख्या ४१ झाली असून १० खासदार धरून हा आकडा ५१ इतका झालेला आहे. आता याच सर्व नेत्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या सर्वांना वाय दर्जाची सुरक्षा होती.
दरम्यान, अलीकडेच राज्यातील काही महत्वाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याने सरकारवर टीका होत असतांना सत्ताधारी नेत्यांची सुरक्षा वाढविण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. यावरून विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.