बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे जागतिक रंगभूमी दिवस साजरा

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात `जागतिक रंगभूमी दिन’ छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात रंगभूमी पूजन करून साजरा करण्यात आला.

 

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमीदिवस शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात रंगभूमी पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी बालरंगभूमी परिषदेची येत्या ३ महिन्यांतील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, सचिव  अमोल ठाकूर, सहसचिव आकाश बाविस्कर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य सुदर्शन पाटील, नेहा महाजन, तसेच रंगकर्मी राहुल महाजन, गौरव लवंगाळे आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content