बारी समाजातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील समस्‍त बारी पंच मंडळाच्या वतीने समाजातील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बारी पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.
जळगाव जिल्ह्यातील बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दहावी , बारावी परीक्षेत ५०% च्‍यावर गुण मिळालेल्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रीका खाली नमूद केलेल्या प्रतिनिधीकडे झेरॉक्‍स प्रत जमा करावयाची आहे. गुणपत्रिकेच्या खालील बाजूस विद्यार्थ्यांचा संपूर्ण घराचा पत्ता व मो.नं असणे आवश्यक आहे.

जळगावात येथे जमा करू शकतात गुणपत्रिकेची झेरॉक्स – गुरूकुल कॉम्‍प्‍युटर्स,7 भायजी शॉपी, का.ऊ.कोल्‍हे विद्यालयाजवळ,जळगाव मो.नं. 9850077623, 9881221833, वायरलेस वर्ल्ड (बारी मोबाईल्‍स्‌), शॉप नं.1 जे.टी.चेंबर,कोर्ट चौक,जळगाव मो.नं. 9273020111, 9890188068. अतुल डेअरी, पिंप्राळा स्‍टॉप,पिंप्राळा, जळगाव. मो.नं. 9420665348. सदगुरू कृपा टेन्‍ट हाऊस, गोपाळपुरा,जुना असोदा रोड, जळगाव. मो.नं. 9822040193, 7691976051 यासह शहरात इतर भागात देखील गुणपत्रिकेची झेरॉक्स जमा करता येणार आहे.

तसेच जळगांव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका पंच प्रतिनिधी बालमुकुंद बारी यांचे व्हॉट्सअप्प मो.9158104512 वर किंवा [email protected] या ई-मेल वर स्पष्ट PDF स्वरूपात पाठवायची आहे. गुणपत्रिका जमा करण्याची अंतिम तिथी दि.१५ जुलै आहे. सर्व विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांसाठी(भोजन व्‍यवस्‍था) मंडळातर्फे करण्यात आलेली आहे. तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गुणपत्रक जमा करावे. असे आवाहन समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांनी केले आहे.

Protected Content