भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अर्चित चांडक हे रूजू झाले असून त्यांनी आज कार्यभार सांभाळला आहे.
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्चित विरेंद्र चांडक(भपोसे) यांचे प्रभारी अधिकारी बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ या कालावधीत त्यांचे समवेत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत बाजारपेठ पोलीस ठाणे हे दिनांक 26/1/2021 ते9/2/2021 पावतो बाजारपेठ पोलीस स्टेशनला हजर राहणार आहे.तदनंतर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचे इतर ठिकाणी कर्तव्या बाबतचे स्वातंत्र्य आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.
प्रजासत्ताक दिनी अर्चित विरेंद्र चांडक(भपोसे) यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचा पदभार सांभाळला.सरकारने जनतेच्या सेवेसाठी पाठविलेले आहे.भुसावळ शहरातील सर्वात आधी गुन्हेगारी मोडून काढणार आहे.गुन्हेगारी टोळ्यांवर लवकरच कारवाई करणार.सिनियर सिटीजन,महिला तसेच जनतेला कुठलीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला येऊन आपली तक्रार नोंदवा.नक्की गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे.जनतेच्या सुरक्षिकतेसाठी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात येणार आहे.
मला जे प्रशिक्षण दिले गेले आहे त्याचे ही पुरेपूर वापर करून गुन्हेगारी कशी कमी करता येणार याकडे लक्ष केंद्रित करणार आहे.तसेच शहरातील राजकीय गावगुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांवर लवकरच कारवाई सुरू होणार आहे.मी खाकी वर्दीचा सेवक आहे. कायदयाच्या चौकटीत राहून काम केले जाणार आहे ज्यावर अन्याय होणार त्यांना न्याय मिळवून करण्यासाठी नेहमी तत्पर राहणार.शहरात कुठलेही अवैध धंदे सुरू राहू देणार नाही. यासाठी जनतेने सहकार्य करावे.आपल्या परिसरात घडलेली घटनाबाबत माहिती दिल्यास आम्ही नक्की आरोपी पर्यत पोहचू शकतो किंवा घटना घडण्यास थांबवू शकतो.यासाठी जनतेला विनंती आहे की सहकार्य करावे असे आवाहन अर्चीत चांडक यांनी केले आहे.