भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असणार्या व कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या पोलीस कर्मचार्याचा आज मृत्यू झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, बाजारपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असणार्या ५५ वर्षे वयाच्या कर्मचार्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जळगाव येथील कोविड रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काल ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आज सायंकाळी त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पोलीस प्रशासनामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संबंधीत कर्मचारी हे जळगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.