Home आरोग्य भुसावळ येथे कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे स्वागत

भुसावळ येथे कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे स्वागत


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाजार पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त होवून आज कामावर रूजू झाले. त्यावेळी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता रुग्णांची संख्या १४ इतकी झाली आहे. त्यातील एक रुग्ण मयत झाला असून बाकी रुग्णांनी भुसावळातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 11 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवस घरामध्ये कॉरंन्टाईन करण्यात आले होते. आज ते कोरोना योद्धा पोलीस कर्मचारी कामावर रुजू झाले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound