बांभोरी येथील मारहाण झालेल्या सरपंच पदाच्या उमेदवारास संरक्षण द्या (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील सरपंच पदासाठीच्या निवडणूक प्रक्रियावर स्थगिती आणणे तसेच मारहाण झालेल्या सचिन बिऱ्हाडे यांना न्याय व संरक्षण मिळवे या मागणीसाठी  वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. 

धरणगाव तालुक्यातील बांभोरी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सचिन बिऱ्हाडे हे सरपंच पदासाठी नामांकन भरण्यासाठी गेले असता त्यांना धक्काबुक्की करत सरकारी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला, तसेच सचिन बिऱ्हाडे यांचे अपहरण करून त्यास पाच ते सहा तास डांबून ठेवले होते. याघटनेचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. या प्रकरणातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सचिन बिऱ्हाडे यांचे अपहरण करणारे आरोपी तसेच या प्रकरणाचे सूत्रधार कोण याची सखोल पोलीस चौकशी करून संबधित आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य शमिभा पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, सुजाता ठाकूर, जितेंद्र केदार डिंगबर सोनवणे, पंचशीला आराख, संगीता मोरे, रेखा शिरसाळे, कविता सपकाळे, माया खैरनार, पंकज सोनवणे, सागर भोई, अमोल महाजन, निवृत्ती पाटील, गौतम खैरनार, प्रज्ञानंद भालेराव, राहूल सुरवाडे आदी उपस्थित होते.      

  

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/222945219530828

 

Protected Content