धरणगाव, प्रतिनिधी । शहरातील कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळा बहुजन क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रांत अधिकारी विनय गोसावी , तहसिलदार नितीनकुमार देवरे , आदर्श नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ , तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे , मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी अनिल सुरवाडे, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे आदी उपस्थित होते.
विशेष निमंत्रित मान्यवरांमध्ये साहित्यिक व देशदूतचे पत्रकार बी. एन. चौधरी, पुण्यनगरीचे धर्मराज मोरे , दिव्य मराठीचे बी. आर. महाजन व कल्पेश महाजन, सकाळचे डी. एस. पाटील , लोकमतचे शरदकुमार बन्सी , पुण्यनगरीचे जितेंद्र महाजन , लोकशाहीचे संपादक भरतभाऊ चौधरी व विनोद रोकडे , तरुण भारतचे कडू महाजन , लोकपत्रिका न्यूजचे संदीप चव्हाण , साईमतचे हाजी इब्राहीम , बुलंद पोलीस टाईम्सचे योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले , राजर्षी छत्रपती शाहु महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कोरोना योध्दा म्हणून महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी , पत्रकार बांधव , न. पा. कर्मचारी , आरोग्य विभागातील कर्मचारी , पोलीस प्रशासन , महावितरणचे कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी, पोस्ट खाते आदींचा सत्कार करण्यात आला. या सर्व मान्यवरांना कोरोना योध्दा सन्मानपत्र व अनमोल ग्रंथ भेट स्वरूप देण्यात आले. नुकतीच ज्यांना पीएचडी मिळाली असे प्रा.रजनीकांत वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शहरातील एसएससी परीक्षेतील गुणवंत – यशवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्रक व अनमोल ग्रंथ देऊन सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला. या सर्व सत्कारार्थी मान्यवरांना गुलाबपुष्प न देता राष्ट्रमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , राजमाता अहिल्यामाई होळकर , राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे गुलामगिरी , शेतकऱ्यांचा आसूड , शिवजयंतीचे खरे जनक , विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले , राजर्षी शाहु महाराज , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , तुकाराम महाराज, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा या महापुरूषांचे जीवनचरीत्र ग्रंथ स्वरूपात भेट देण्यात आले.
याप्रसंगी काही विद्यार्थांनी व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांनी मुलांना खचून न जाता व्यापार – व्यवसाय – शिक्षण या माध्यमातुन मोठे व्हा !…. असा संदेश देऊन गुणवंताना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील व छत्रपती क्रांती सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले तर आभार बामसेफचे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र ( आबा ) वाघ , बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील , बामसेफचे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य – महासचिव मोहन शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , कैलास पवार , व्ही. टी. माळी , किशोर पवार , आकाश बिवाल , प्रोटॉनचे सुनिल देशमुख , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , गौतम गजरे , विनोद बीजबीरे , सूरज वाघरे , नगर मोमीन आदींनी परिश्रम घेतले.