चाळीसगाव, प्रतिनिधी| विविध प्रलंबित मागण्यासाठी सुरू असलेल्या एस.टी. कामगारांच्या बेमुदत संपाला भारतीय बहुजन क्रांती दलाकडून जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आले आहेत. मोरसिंगभाऊ राठोड यांनी संपात सहभागी होऊन जाहीर केले आहे.
कोरोनाच्या काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. कडकडीत टाळेबंदीत कर्मचाऱ्यांनी परिवहन महामंडळाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करून दिला. असे असताना गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या प्रलंबीतच आहे. यामुळे विविध मागण्या ह्या राज्य सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात यासाठी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून चाळीसगाव परीवहन महामंडळाच्या एस.टी. कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप पुन्हा चार दिवसांपासून सुरू झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे या मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहेत. या संपाला भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांनी स्वतः कामगारांच्या संपात सहभागी होऊन प्रश्न समजून घेतले. व या संपाला भारतीय बहुजन क्रांती दलाचे जाहीर पाठिंबा असल्याचे सुतोवाच केले. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो अशा विविध घोबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. याप्रसंगी कामगार संघटना सचिव विनोद पाटील, कामगार सेना सचिव सुनील जाधव, उदय सोनवणे, चालक विजय शर्मा, किशोर पाटील, मुस्ताक शेख, नितीन चव्हाण, सुरेश कुमावत, पप्पू कोळी व मोठ्या संख्येने एस.टी. कर्मचारी उपस्थित होते.