भुसावळ प्रतिनिधी । महाविद्यालयात मानव्यविद्या शाखेअंतर्गत सुरू असलेल्या लिंगभाव समानता सप्ताहाचे आयोजन केलेले असून त्यानुसार ७ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माजी संचालक, भाषा विभाग डॉ.शोभा शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य मीनाक्षी वायकोळे, समन्वयक प्रा.प्रफुल्ल इंगोले, प्रा.रेखा गाजरे, प्रा.एस.पी.झनके व प्रा. स्मिता चौधरी हे होते.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ.शोभा शिंदे यांनी आपले विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना लिंगभाव विसरून व्यक्ती म्हणून स्वतःला विकसित करावे, असे आवाहन केले. सदरप्रसंगी प्रा.स्मिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. अदनान अहमद याने आभार मानले. प्रा.एन.एन.झोपे, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.हिवाळे, प्रा.दीपक शिरसाट, प्रा.सचिन राजपूत, प्रा.निखिल तायडे, डॉ.सुषमा अहिरे, डॉ स्वाती महाजन उपस्थित होते.