भुसावळ : प्रतिनिधी । येथील बस स्थानकातून प्रवाशांची पाकिटे चोरणारा चोरटा पोलिसांनी काल सापळा रचून पकडला
भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुरन 114/2021 भादवी कलम 379 प्रमाणे .19 मार्चरोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी गोविंद कहर (वय 38 रा.मु.ढकोची , पोस्ट.खालवा , ता.हरसोद , जि.खंडवा ) .भुसावळ बसस्टॅन्डमध्ये औरंगाबादला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्ट च्या उजव्या खिश्यातील पाकीट व 21300 रुपये रक्कम अज्ञात व्यक्तीने काढुन घेतले होती त्यांनी उतरुन विचारणा केली असता लोकांनी सांगितले की हसन अली नियाज अली उर्फ हसु ( रा. पापानगर इराणी मोहल्ला भुसावळ ) याने ते पैसे काढले त्यांनी गुन्हा दाखल केला
फरार आरोपीची पोलीस अधीक्षक अर्चित चाँडक यांना गुप्त बातमी मिळाली होती त्यावरून त्याला 26 मार्चरोजी जाममोहल्ला भागातून सापळा रचून अटक करण्यात आली भुसावळ न्यायालयाने त्यास 2दिवस पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडीत आरोपीकडुन चोरीस गेलेल्या रकमेपैकी 9500 रुपये हस्तगत करण्यात आले .
ही कारवाई पो.ना. रमण सुरळकर , उमाकांत पाटील, समाधान पाटील, पो.काॅ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली पुढील तपास पो.हे.काॅ.संजय भदाने करीत आहेत..