बस अपघाताच्या मदत कार्यासाठी आ. गिरीश महाजन रवाना

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमळनेर आगाराच्या इंदूरहून परत येणार्‍या बसला झालेल्या भीषण अपघाताच्या मदत कार्यासाठी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना रवाना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

अमळनेर आगाराच्या इंदूरहून येणार्‍या एस. टी. बसला भीषण अपघात झाला असून ही बस नर्मदा नदीपात्रात कोसळली आहे. या अपघातात आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना भाष्य केले. ते म्हणाले की, अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रशासनाने संयुक्तररित्या रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना दहा लाख रूपये तर केंद्र सरकारने दोन लक्ष रूपयांची घोषणा केली आहे.

 

दरम्यान, फडणवीस पुढे म्हणाले की, या अपघातात अनेक जण नर्मदा नदीपात्रात वाहून गेले असल्याची शक्यता आहे. त्यांना शोधण्याचे काम अजून देखील सुरूच आहे. या संदर्भात जळगाव आणि खरगोन जिल्हाधिकार्‍यांनी मदत कक्ष सुरू केले आहेत. तर या मदत कार्यात सहभागी होण्यासाठी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना तात्काळ तेथे पाठविण्यात आले असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली आहे.

Protected Content