जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातील एसटी वर्क शॉपजवळील गेटजवळून महिलेच्या पर्समधून ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिता मधुकर ठाकूर (वय-३५) रा. किनगाव ता. यावल. ह.मु. नवी मुंबई या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता सुनिता ठाकूर या बाहेरगावी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी बसस्थानक आवारातील एसटी वर्कशॉप येथील गेटजवळ उभ्या होत्या. त्यांच्याजवळील पर्समधील सोन्याचे दागिने असा एकुण ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.