चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानकात असलेल्या प्रवाशी माहिला बसमध्ये चढत असतांना तिच्या पर्समधील १ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरण चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणा शांताराम सुतार (वय-३६) रा. बहादरपूर ता.पारेाळा जि.जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता त्या चाळीसगाव येथे कामानिमित्त आलेल्या होत्या. काम आटोपून पुन्हा पारोळा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना चाळीसगाव बसस्थानक येथे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधून १ लाख रूपये किंमतीच्या २५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचे समोर आले. दरम्यान, ही बाब प्रवाशी महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.