बळीराम पेठेतून दुचाकी लंपास; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दतील बळीरामपेठेतून दुचाकी लंपास झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील बळीराम पेठे परिसरातील आसरा संकुलमध्ये चेतन रविंद्र वाणी हे परिवारासह
राहतात. ११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता त्यांनी आपली बजाज पल्सर दुचाकी क्रमांक (एमएच.१९.बीटी.४४८८) काळ्या रंगाची ही अपार्टमेंटच्या बाहेर लावलेली होती. १२ रोजी पहाटे ५ वाजता त्यांचे वडील बाहेर आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. चेतन वाणी यांनी दुचाकीचा संपुर्ण परिसरात शोध घेतला असता ती मिळून न आल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याची त्यांची खात्री झाली. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सध्या बाजारपेठेत पुवर्वत झाल्या आहे. व्यापारी संकुलांमध्ये गर्दी होत असल्याने चोरटे या व्यापरी संकुलातून दुचाकी लांबवित असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे शहरात सध्या दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

Protected Content