बनावट स्वाक्षऱ्या करून पत्नीची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पतीने पत्नीच्या बनावट स्वाक्षऱ्याचा वापर करून पॉवर ऑफ ॲन्टर्णीचा अधिकार दिलेला नसतांना  कर्नाटक येथे प्लॅट घेण्यासाठी केलेला मिळून केलेला सौदा रद्द केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम अभिषेक शर्मा (वय-३२) रा. नेहरूनगर, मोहाडी, जळगाव या आई-वडील भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या कर्नाटक राज्यातील बंगलरू येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. २०१५ मध्ये त्यांचा विवाह अभिषेक सूनील शर्मा (वय-३२) रा. आदर्शनगर, जळगाव यांच्याशी झाला. दोघे पती-पत्नी हे नोकरीला कर्नाटक येथे नोकरी करतात. त्यानंतर दोघांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये बँगलरू येथे एकूण ७९ लाख ३२ हजार रुपये किमतीचा फ्लॅट बुक केला.  त्यांसाठी त्यांनी  १६ लाख रूपये देखील अडव्हान्स म्हणून दिले. यामध्ये पूनम शर्मा यांचे ८ तर त्यांचे पती अभिषेक शर्मा यांचे ८ असे एकूण १६ लाख रुपये दिले होते. सदर फ्लॅट हा दोघांच्या नावे रजिस्टर केला होता. याचदरम्यान पती-पत्नीचा वाद झाल्याने पुनम शर्मा या माहेरी नेहरूनगर, जळगाव येथे आईवडिलांकडे राहण्यासाठी गेल्या तर तीचा पती आदर्श नगर येथे राहत आहे.

 

अभिषेक शर्मा याने पत्नी पूनम शर्मा यांना न सांगता पावर ऑफ अँटर्नीसाठी ५०० रुपये स्टॅम्प पेपर वरती बनावट स्वाक्षरी करून फ्लॅट घेण्याचा व्यवहार सौदा रद्द केला. तसेच बँकेचे लोन देखील रद्द करून टाकले. फ्लॅट घेण्यासाठी दिलेल्या १६ लाख रूपये पूनम शर्मा यांच्या हिस्स्याचे ४ लाख रूपेय त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. याबाबत पुनम यांनी कंपनीचा मॅनेजरला फोन करून विचारले असता पती अभिषेक शर्मा याने पावर ऑफ ॲन्टर्णीचा अधिकार दिलेला नसतांना प्लॅट रद्द केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पत्नी पूनम शर्मा यांनी मंगळवार २ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती अभिषेक शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद गिरासे करीत आहे.

Protected Content