बनावट इन्स्टाग्रामचे खाते तयार करत तरुणीची बदनामी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागातील तरुणीच्या नावाचा वापर करत तिचे इन्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन तरुणीची बदनामी करणाऱ्या एका जणांविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात तरुणी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. १५ फेब्रुवारी २०२३ पासून ते १५ मार्च दरम्यान अनोळखी व्यक्तीने तरुणीच्या नावाचा वापर करत इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन इतरांना चॅटींग करत शिवीगाळ केली, तसेच तरुणीची बदनामी केली, प्रकार समोर आल्यानंतर तरुणीने बुधवारी दुपारी याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बनावट इन्स्टाग्रामचे खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.

Protected Content