मुंबई : वृत्तसंस्था । विधिमंडळ अधिवेशनात बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? असा सवाल भाजपाने विचारला आहे.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंवरील कारवाईच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेत असून यामुळे सभागृहाचं कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर आकारण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाण साधला.
ते म्हणाले की, “२००७ मध्ये बजाज कंपनीला २०० एकर जागा दिली असताना २०२० पर्यंत बजाज कंपनीने यासंदर्भात कुठलंही काम केलं नाही. एमआयडीसीने विलंबशुल्क म्हणून १४३ कोटी रुपये त्यांच्याकडे मागितले असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आणि १४३ कोटींच्या ऐवजी अवघे २५ कोटी घ्यायचे हा निर्णय झाला का?”.