चोरांचा पीपीई किट घालून आयसीआयसीआय होम फायनान्सावर दरोडा; ५ कोटीचे दागिने लंपास

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स कार्यालयावर मोठा दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील डोंगरे वसतीगृह चौकात आयसीआयसीआय होम फायनान्सचे कार्यालय आहे. या कार्यालयातील २२२ खातेदारांचे लॉकर्स फोडून चोरटयांनी तब्बल ५ कोटी रूपयांचे दागिने पळवले आहे.

३ मे रोजी शुक्रवारी मध्यरात्री दोन चोर पीपीई किट घालून आले आणि त्यांनी १५ मिनिटांत ४ कोटी ९२ लाखचे दागिने लंपास केले. हा दरोडा पडला तेव्हा पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक होते. मात्र, चोर मागच्या खिडकीतून पळून गेले. शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. सीसीटीव्हीचा जागता पहारा आणि सिक्युरिटी तैनात असतानाही चोरट्यांनी आयसीआयसीआय होम फायनान्सच्या कार्यालयात शिरण्याचे धाडस कसे केले, याबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे खासगी पतसंस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून या चोरीप्रकरणाचा तपास सुरु आहे. या लॉकर्सच्या चाव्या मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ही नाशिकमधील मोठी चोरीची घटना मानली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी वेगळाच संशय येत आहे.

Protected Content