बंद घर फोडून २ लाखाची रोकड लांबविली

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सावतामाळी नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपयांची रोकड लांबण्याची घटना उघडकीला आले आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एरंडोल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण तुकाराम मिस्तरी वय 32 रा. सावतामाळी नगर हे फर्निचरचे काम करतात. १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातून २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची १६ एप्रिल रोजी दुपारी उघडकीला आले. याबाबत प्रवीण मिस्तरी यांनी एरंडोल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.

 

Protected Content