बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगरजवळील वाटीका आश्रम परिसरातील बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत सोमवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोविंद सुकदेव पाटील (वय-५६) रा. गुरूकृपा सोसायटी, वाटीका आश्रम जवळ, खोटे नगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ मार्च रोजी त्यांनी राहते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. गोविंद पाटील हे घरी आल्यानंतर त्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. याबाबत जळगाव तालुका पोलीसांनी माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सोमवारी १३ मार्च रोजी दुपारी गोविंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.

Protected Content