बंद घर फोडून रोकडसह मुद्देमालाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुरेशदादा जैन नगर येथील गेंदालाल मिल परिसरात बंद घर फोडून रोख रक्कम, साड्या आणि घरातील वस्तू असा एकुण ११ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल अभिमन भालेराव (वय-५७) रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल, जळगाव हे  आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात ४ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून २० हजार रुपयांची रोकड, सिलिंग फॅन आणि घरातील भांडे असा एकूण २२ हजार ८०० रुपये किमतीची मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात दिवसानंतर मंगल भालेराव यांनी शनिवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.

Protected Content