बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मालती विश्वफॉरेस्ट कॉलनी येथे एकाचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील देव घरातील सोन्या-चांदीच्या मुर्त्या चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याघटनेबाबत बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद विश्वनाथ कुळकर्णी (वय-७५, रा. मालती विश्व फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान त्यांचे घर बंद होते. या बंद घर असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा कापून आत प्रवेश करत देव घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ५ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे उघडकीला आला आहे. याबाबत अरविंद विश्वनाथ कुलकर्णी यांनी बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे करीत आहे.

Protected Content