बँकेच्या शिपायाच्या आत्महत्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील युनियन बँकेच्या शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी निम्न तापी प्रकल्पाचा चालक व अमळनेरातील तरूणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सागर एकनाथ पाटील असे मयत शिपायाचे नाव आहे. सागर पाटील याने ५ जून रोजी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी ५ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सागर याने त्याचे वडील एकनाथ पंढरीनाथ पाटील यांना मी नायगाव येथे येत असल्याचा फोन केला होता.  दुपारी बँकेत सागर आला नाही म्हणून मॅनेजर शुक्ला यांनी चौकशी केल्यावर सागरने आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सागरने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.  त्यात त्याने स्वप्नील विलास शिंदे उर्फ सैंदाने रा.अमळनेर व संतोष साहेबराव पोरजे रा. त्र्यंबकेश्वर नाशिक हल्ली मुक्काम निम्न तापी प्रकल्प हे दोघे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप केला आहे.  स्वप्नील पाटबंधारे खात्यात आहे तो गाडी चालवतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझ्या घरच्यांचा काही एक संबंध नाही. त्यांना सोडू नका, असेही चिठ्ठीत लिहिले होते. सागरच्या आत्महत्येनंतर त्याची मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिराजवळ बेवारस स्थितीत आढळून आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून ती पोलिसांनी जप्त केली होती. सागरच्या पत्नीने देखील आपल्यावर होणारा छळ बाबत माहिती दिली होती. छळ करणारे दोन्ही संशयित आरोपी फरार झालेले आहेत. त्यानुसार सागरचे वडील एकनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज अमळनेर पोलीसात छळ करणारे स्वप्नील शिंदे व संतोष पोरजे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास  तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.

 

Protected Content