फोन टॅपिंग प्रकरण : दोन आठवडय़ांपूर्वी चौकशीची घोषणा, आदेश मात्र नाहीत !

anil deshmukh

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्ष नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १० ते १२ दिवसांपूर्वी केली असली, तरी त्याबाबतचे अधिकृत आदेश मात्र जारी झालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुळात चौकशी होऊच नये, यासाठीच काही अधिकारी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दूरध्वनीवरील संभाषण पोलिसांकडून चोरून ऐकण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन आठवडय़ांपूर्वी केली होती. फक्त तीन पक्षांचे नेते कशाला, भाजपच्या काही नेत्यांचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकण्यात आल्याचा आरोप झाला होता. यावर त्याचीही चौकशी करण्यात येईल, असे देशमुख यांनी जाहीर केले होते. परंतू चौकशीची घोषणा झाली तरी आदेश अद्याप जारी झालेला नाही. अंतिम आदेश मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर होईल. परंतु पोलीस आणि मंत्रालयाच्या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ही चौकशी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.

Protected Content