Home Cities यावल फैजपूर शहरात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

फैजपूर शहरात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

0
47


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशातील महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीएसटी वाढच्या विरोधात फैजपूर येथे आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार फैजपूर येथे आ. शिरीषदादा चौधरी यांचे नेतृत्वाखाली महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी वाढ व केंद्राच्या जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी सुभाष चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, युवा नेते धनंजय चौधरी, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शेखर पाटील, नगरसेवक केतन किरंगे यांनी रास्ता रोको आंदोलनात मार्गदर्शन केले. याप्रसंगी केंद्रातील धोरण, घरगुती गॅस दरवाढ, वीजबिल वाढ, जीवनावश्यक वस्तूवरील 5 टक्के जी. एस. टी. वाढ झाल्याबद्दल घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी फैजपूर गटनेते कलीम मन्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, फैजपूर शहराध्यक्ष शेख रियाज, यावल शहराध्यक्ष कदिर खान, महिला आघाडी चंद्रकला इंगळे, चंद्रशेखर चौधरी, युवकचे वसीम तडवी, जंजाळकर, हर्षल दानी, आसिफ मेकॅनिकल, सर्पराज तडवी, गणेश गुरव, इरफान मेंबर, सेवा दलचे भरत कुवर यांच्यासह ग्रामीण व शहर कॉग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला कॉग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्याक कॉग्रेस, मागासवर्गीय विभाग पदाधिकारी, इत्यादी कार्यकते उपस्थित होते.


Protected Content

Play sound