फैजपूर , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारिता आणि करियर या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. शेरशिंग पाडवी, प्रा. डॉ. सरला तडवी, पत्रकार नंदकिशोर अग्रवाल उपस्थित होते.
विशेष हिवाळी शिबिराचा आज दि. २५ मार्च रोजी तिसरा दिवस आहे. दुपारच्या सत्रामध्ये पत्रकारिता आणि करियर या विषयावर फैजपूर दिव्य मराठीचे प्रतिनिधी नंदकिशोर अग्रवाल यांनी प्रकाश टाकला. यात त्यांनी पत्रकार क्षेतातील काळानुसार होणारे बदल सदोहरण स्पष्ट केले. श्री. अग्रवाल यांनी शोध पत्रकारितेचे महत्व विद्यार्थ्यांना विषद केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी डॉ. दीपक सूर्यवंशी व सहकारी प्रकाश भिरूड यांनी परिश्रम घेतले.