Home Uncategorized फैजपूर येथे रस्त्यावर डांबरीकरण करण्याची निवेदनाद्वारे मागणी!

फैजपूर येथे रस्त्यावर डांबरीकरण करण्याची निवेदनाद्वारे मागणी!


फैजपूर, ता. यावल, प्रतिनिधी | फैजपूर ते रोझोदा दरम्यानचा रस्त्याच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी आ. शिरीष चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावल तालुक्यातील फैजपूर येथील रोझोदा रस्त्यावरील सतपंथ पंथाच्या समाधी स्थळापासून ते रोझोदा शिवरस्ता पर्यंत १ कि‌.मी. पर्यंतचा शेतरस्ता नाही. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करावे.व रोझोदा शिव रस्ता पासून रोझोदा गावापर्यंत डांबरीकरण करून घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आ. शिरीष चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सदर रस्ता दुरुस्ती झाल्यास दोन्ही गावातील अंतर कमी होईल. व नागरिकांना फैजपूर येथे ये-जा करण्याचा मार्ग सुखर होईल. यावेळी लवकरच रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन आ. शिरीष चौधरी यांनी दिले. यावेळी संदीप चौधरी , नगरसेवक केतन किरंगे, योगेश नेमाडे, नितीन पाटील, नथु होले तुषार राणे, कुंदन चौधरी , मधुकर चौधरी, रोझोदा येथील शेतकरी स्वप्नील वायकोळे, डिगंबर नेमाडे, पंडित भारंबे, होमकांत सरोदे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound