फैजपूरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जागर यात्रा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिका, सावदा नगरपालिका आणि धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामानाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सकाळी शहरातून जागर यात्रा काढण्यात आली.

 

जागर यात्रेत परिसरातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक वेशभूषा करत सहभाग नोंदविला. त्यानंतर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात जागर यात्रेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी सावदा नगरपालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, लेप्टनंट डॉ.आर.आर.राजपूत यांनी मार्गदर्शन केले.  तसेच सावदा आ.ग.म. हायस्कूलचे शिक्षक संजय महाजन व नंदू पाटील यांच्या मार्गदर्शनात एक प्रबोधनपर पथनाट्य सादर करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर चौधरी, मुख्याधिकारी सावदा नगरपरिषद यांनी केले. सूत्रसंचालन एन.एन.एस फैजपूर युनिटचे अधिकारी लेप्ट डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार रासेयोचे कार्यक्रम अधकारी डॉ.डी.एल. सुर्यवंशी यांनी केले.

 

याप्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, प्रा.ए.जी.सरोदे, फैजपूर नगरपालिका मुख्याधिकारी वैभव लोंढे, सी.सी. सपकाळे, युनूस सर, तसेच आ.ग.म.हायस्कूल सावदा, एन.जी.पी. कनिष्ठ महाविद्याल सावदा, एन.वी.एच.पाटील हायस्कूल सावदा, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल फैजपूर, मुनिसिपल हायस्कूल फैजपूर, बहिणाबाई हायस्कूल फैजपूर व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

Protected Content