फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथे रेशन अधिकार कृती समितीचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी रेशन कृती समिती ही अन्न अधिकार जो की भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत कर्तव्याचा भाग आहे. त्यासाठी असलेली रेशन अन्न नागरी पुरवठा विभटगाच्या योजना ह्या नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठीचा लोकशाही मार्गाने असलेला लोकलढा आहे. यात सहभागी होऊन आपलण पण लोकसेवेचा वाटा उचलावा. असे मत व्यक्त केले.
यावेळी उद्घाटनपर शुभेच्छामध्ये श्री आखेगावकर यांनी समिती ही शासन प्रशासन व जनतेच्या मधील दुवा म्हणून चांगले काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी रेशन अधिकार कृती समितीचे अध्यक्ष शमिभा पाटील, कार्यअध्यक्ष डॉ. दानिश, सचिव एजाज, उपाध्यक्ष अमोल निंबाळे, उपाध्यक्ष काजी मुजम्मिल, सहसचिव अजीज कुरैशी, संघटक अजय मेढे, मनोज चंदनशिव, अल्ताफ खान, साद तडवी, अरमान तडवी, सदस्य शब्बीर मोमीन, जलील कुरैशी, जकिर रुबाब तडवी, तोसिफ खाटीक, सोनू भिका वाघुळदे, आसिफ सज्जात, कफिल पहेलवान, मस्तकीम मण्यार व रेशन अधिकार कृती समिती साकळी तसेच गाते ता रावेर सागर बाविस्कर, प्रा. धिरज खैरे, साकळीचे डॉ. सुनिल पाटील, नासीर खान कार्यअध्यक्ष, डॉ. अकरम खान उपाध्यक्ष, शेख सलीम उपकार्यअध्यक्ष, मनोज तेली सचिव, इस्माईल तडवी उपसचिव, सदस्य राजू पिंजारी, शाहिद कुरैशी, मिलिंद जंजाळे, सय्यद रियाज, माजीद खान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये फैजपूरचे मान्यवर अब्दुल जलील, अजमत बावा, लेखराज बदलानी, कल्लू पहेलवान, साजिद खाटीक, आवेश मण्यार, शेख फय्युम, शेख नासीर शेख शोएब आदी उपस्थित होते.