फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
या मदतीचा धनादेश सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, अनिल नारखेडे, व्यवस्थापक राजेश कानडे सहव्यवस्थपक काशीनाथ वारके यांनी तर श्री लक्ष्मी नागरी सहकारी पातसंथेतर्फे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हाईस चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, संचालक नीलकंठ सराफ, व्यवस्थापक सौ. जयश्री चौधरी यांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे सूपूर्द केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस या संस्थांनी मदत केल्याबद्दल डॉ. थोरबोले यांनी दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी, संचालक व सदस्यांचे कौतूक केले. तसेच दानशूरांनी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन केले.