फैजपूर प्रतिनिधी । कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटीच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांची मदतिचा धनादेश आज शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आला.
फैजपूर येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटीतर्फे नित्याने समाजपयोगी उपक्रम राबविणे, संकटकाळी धावून येणे असे सेवाभावी कार्य ही संस्था करीत असते. सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे. सध्या देशात कोरोनाचे संकट असल्याने सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास ५१ हजार रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. यामदतीचा शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना सुपूर्द केला. चेअरमन हेमराज चौधरी, व्हा.चेअरमन नितीन राणे, संचालक चंद्रशेखर चौधरी, सेक्रेटरी सुनील क्षत्रिय यांनी ५१ हजार रुपये निधी मदतीचा धनादेश फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना सुपूर्द केला. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरपालिका कर निरीक्षक बाजीराव नवले आदी उपस्थित होते. दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे.