फैजपूरला आश्रय फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

 

फैजपूर, प्रतिनिधी  । आश्रय फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच फैजपूर येथे पार पडला. या समारंभात १० वी च्या परीक्षेत ९० टक्केच्या वर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

आश्रय फाउंडेशनतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात रिया नितीन महाजन (९८%), पूर्वा राजेश चौधरी हिला (९५%) या दोघींचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक, भगवतगीता, आणि परीक्षेच्या दिवशी उपयोगी सर्व साहित्य देवून गौरविण्यात आले. हा सत्कार डाॅ.प्रिती सावळे, डाॅ.मनिषा पाटील ,डाॅ.भाग्यश्री महाजन,  अरुणा प्रभाकर खाचणे, डाॅ.शितल पाटील, डाॅ.नम्रता भारंबे, डाॅ.वर्षा बोरोले, डाॅ.वैशाली कोळंबे, डाॅ.योगीता भटकर, डाॅ.एकता सरोदे यांच्या हस्ते करण्यात आला. हा सोहळा डाॅ.शैलेश खाचणे यांच्या मातोश्री अरूणा खाचणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी डाॅ.संगीता महाजन, डाॅ.संगीता चौधरी, डाॅ.जागृती फेगडे, डाॅ.वृषाली पाटील, डाॅ.स्नेहल जावळे, डाॅ.सोनम खाचणे, डाॅ.हिरकणी पाटील, डाॅ.नम्रता धांडे यांच्यासह सर्व आश्रय फाऊंडेशन मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रम याश्वितेसाठी आश्रय फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते गोटूभाऊ भारंबे, कन्हैया चौधरी,चंदु चौधरी, पप्पू तांबट यांनी प्रयत्न केले. 

Protected Content