फैजपूरच्या पत्रकार संस्थेला राज्य संघाची संलग्नता

 

फैजपूर : प्रतिनिधी । पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व विविध सामाजिक उपक्रम राबवित लौकिक मिळविलेल्या फैजपूर येथील नोंदणीकृत पत्रकार संस्थेला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई )सोबत संलग्नित करण्यात आले आहे.

 

७ ऑगस्टरोजी खिरोदा ( ता.रावेर  ) येथे महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकुर, आमदार शिरीष चौधरी, मा. खा. उल्हास पाटील,  राज्य पत्रकार  संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्य पत्रकार संघासोबत पत्रकार संस्था फैजपूर संलग्न करण्यात येत असल्याचे प्रविण सपकाळे यांच्या सहीचे अधिकृत पत्र पत्रकार संस्था अध्यक्ष फारुक शेख यांना देण्यात आले आहे.

 

यावेळी फारुक शेख यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अरुण होले, नंदकुमार अग्रवाल, समीर तडवी, ताप्ती सातपुडा जर्नलीस्ट असोसिएशन अध्यक्ष शामकांत पाटील, दिव्य मराठीचे  रावेरचे  पत्रकार कृष्णा पाटील, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील, नजमोद्दीन शेख, मुबारक तडवी, साजीद शेख ( सावदा) , अजय महाजन, देवेंद्र झोपे  (फैजपूर )  आदी  उपस्थित होते.

व्यासपीठावर राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदिप गायके, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, भूषण महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, दिपक सपकाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी, रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content