फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरात अजून एक नवीन कोरोना बाधीत आढळून आला असून याचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
फैजपूर शहरातील कोरोना बाधीतांची संख्या वाढतच चालली आहे. मिल्लत नगर भागातील आधी पॉझिटीव्ह झालेल्या डॉक्टरच्या पत्नीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे रिपोर्टवरून स्पष्ट झालेले आहे. या पाठोपाठ आता शहरातील खुशालभाऊ रोडवरील भागातील एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. रात्री उशीरा हा रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामुळे आज सकाळी संबंधीत रूग्णाचा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.