फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरातील दुकानांसाठी नवीन नियमावली पालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली असून यात कंटेनमेंट झोन वगळता बहुतांश बाजारपेठ सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
फैजपुरातील दुकानांसाठी पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून यात प्रामुख्याने शहरातील तसेच इतर शहरातील कन्टेनमेंट झोन मधील रहिवाशी असणार्या व्यापार्यांना फैजपुर शहरातील त्यांचे दुकान उघडता येणार नाही. या नियमांचे पालन न केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी आदेश पारित केले आहेत. यामुळे काही व्यासायिकांना दिलासा मिळाला असला तरी तर काहींचा हिरमोड झाला आहे.
पालीका प्रशासनाच्या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने त्याचाच एक भाग म्हणुन फैजपुर शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यासाठी
खालील सुचना देण्यात येत आहेत.
१) फैजपुर शहरातील दुकाने उघडल्यावर मास्क व हातात ग्लोज घालणे अनिवार्य असुन दुकानांना
सॅनिटाईज (निर्जंतुकीकरण ) करणे आवश्यक आहे.
२) दुकानांमध्ये एसीची उपयोग करता येणार नाही.
३) ग्राहकांमध्ये शारीरिक सामाजिक अंतर ठेवावे लागेल.
४) प्रत्येक दुकानदारास आपले काऊंटरवर सॅनिटाईजर ठेवणे आवश्यक आहे.
५) दुकानांसमोर एका वेळेस फक्त पाच नागरीकांना उभे राहता येईल.
६) ग्राहकांना सुद्धा मारक घालणे व शारीरिक अंतर सहा फुटांचे ठेवणे अनिवार्य आहे.
७) ६० वर्षावरील व्यक्तीनी तसेच ज्यांना मधुमेह,कर्करोग -हदयरोग अथवा अन्य दुर्धर आजार व्यक्तीने दुकानात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करु नये.
८) शहरातील तसेच इतर शहरातील कन्टेनमेंट झोन मधील रहिवाशी असणार्या दुकानदारांना फैजपुर
शहरातील त्यांचे दुकान उघडता येणार नाही.
२) अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी शासनाचे आदेशानुसार ठरलेल्या वेळी दुकाने सकाळी १० ते ५ या वेळेतच उघडावी व बंद करावी, जर दुकानात गर्दी झालेली असेल सोशल डिस्टसींगचे पालन न झाल्यास दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.
दरम्यान, या शासन आदेशाचे पालन करावे, जे कोणी दुकानदार वरील नियमांचे पालन करणार नाही त्यास तो स्वतः जबाबदार राहतील व त्याचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. वरील सर्व नियम व सुचना आपले सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. कृपया शासनास सहकार्य करावे असे आवाहन पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.