रावेर येथील मृत महिला कोरोना पॉझिटीव्ह

रावेर प्रतिनिधी । येथे काल मृत झालेल्या महिलेचा स्वॅब रिपोर्ट हा कोरोना पॉझिटीव्ह आला असून तिचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात आला आहे.

रावेर येथील जिजाऊ नगरातील ६० वर्षााच्या महिलेचा काल उपचार सुरू असतांना मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून तिचे स्वॅब सँपल घेण्यात आले होते. आज रात्री ही महिला कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट आला. यामुळे प्रशासनाने तातडीने तिचा रहिवास असणार्‍या भागात धाव घेतली. तहसीलदार आणि मुख्याधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ नगर भागात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून हा भाग सील करण्यात आला आहे. दरम्यान, रावेरमधील दुसर्‍या कोरोना पाझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content