जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आलेल्या फुले मार्केटमध्ये महिलेच्या पर्समधून १२ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पल्लवी राजेश कुळकर्णी (वय-३६) रा. रिंगरोड जळगाव हे कामाच्या निमित्ताने काही वस्तू खरेदी करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोरील फुले मार्केटमध्ये त्यांच्या बहिणीसोबत सोमवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आल्या. फुले मार्केटमधील चंदूलाल रसवंती आणि गुप्ता शेव दुकानाच्या दरम्यान त्या जात असतांना त्यांच्या मोठ्या पिशवीत पर्स ठेवलेली असतांना पर्ससहित १२ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली. थोड्या वेळाने पुढे गेल्यावर कुळकर्णी यांनी पिशवीतील पर्स गेल्याचे लक्षात आले. शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.