फुले मार्केटमधून महिलेची सोन्याची मंगलपोत लंपास; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी लाबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ऐश्वर्या रामकृष्ण सपकाळे (वय-२७) रा. गणपती मंदीराजवळ खोटे नगर हे शनिवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान फुले मार्केट परिसरातील चंदूलाल सरवंतीच्या बाजूला असलेल्या सागर बॅग जवळ गरजू वस्तूंची खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. वस्तू खरेदी करण्यात मग्न असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत तोडून नेली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.

Protected Content