फुफनगरीतून ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

aropi

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील फुपनगरी येथील ट्रक्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तिघांना पोलीसांनी सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, ४ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील लिलाधन रमेश सोनवणे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यापासून एलसीबी पथकालील पोलीस चोरट्यांच्या शोधार्थ होते. अखेर चोरटे कानळदा, डांभूर्णी, विदगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी जितेंद्र उर्फ विशाल एकनाथ सपकाळे (२०), आकाश ईच्छाराम सपकाळे (२१), मयूर सोपान सपकाळे (२१, सर्व रा. कानळदा ता. जळगाव) या तिघांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, जितेंद्र पाटील, विजयसिंग पाटील, गफुर तडवी, राहुल पाटील, मुरलीधर बारी आदींनी केली आहे. दरम्यान तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी ट्रक्टर चोरी केल्याचा गुन्हा कबुल केला आहे. चोरी केलेले ट्रक्टर हे शिरपूर तालुक्यातील इसाळे गावात असल्याचे सांगितले आहे. तिघा संशयित आरोपींना तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content