मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फायनान्स कंपनीतील सदस्याचे बायोमॅट्रीकद्वारे अंगठे घेवून कर्ज वाटप केल्याचे भासवून तब्बल ६६ लाख ६६ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील भारत फायनान्स इाक्लयुजन लिमिटेड कंपनीत फिल्ड असिस्टंट म्हणून कार्यरत असलेले निखील राजेंद्र सावकरे, अवधुत ज्ञानेश्वर सोनवणे आणि पंकज रामधन वानखेडे यांनी कंपनीचे सदस्य असेलेल एकुण २४७ सदस्याचे बायोमॅट्रीक पद्ध्दतीने कर्ज मंजूर करून सदस्यांचे अंगठ घेवून कर्जदार असल्याचे कर्जदरांना कर्ज वाटप केल्याचे भासवून तब्बल ६६ लाख ६६ हजार ९२४ रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. यासंदर्भात फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक एकनाथ भिमगीर गोसावी (वय-३२) रा. चाळीसगाव यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निखील राजेंद्र सावकरे, अवधुत ज्ञानेश्वर सोनवणे आणि पंकज रामधन वानखेडे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.