फापोरे बु ॥ साठवण बंधाऱ्याला पाट्या नसल्याने लाखो लिटर पाणी जातेय वाया

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील फापोरे बुद्रुक येथील साठवण बंधाऱ्याला पाट्या नसल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. भविष्यात नदी काठावरील गावांना पाणी टंचाई निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत असून नागरीकांचा संताप व्यक्त होत आहे. 

फापोरे येथील साठवण बंधाऱ्यास कामाची प्रशासकीय मान्यता ही मृद व जलसंधारण विभागाकडील विशेष निधीच्या योजनेतून सन-२०१८-१९ या वर्षाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आली होती. सदर लेखाशीर्ष जिल्हा नियोजन समितीचे नाही. जलयुक्त आराखडा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. सदर लेखाशिर्ष शासनाने मार्च 2020 पासून बंद केल्यामुळे या लेखाशीर्षाखाली शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही.  काम ठेकेदाराने पूर्ण केलेले असून संबधीत ठेकेदाराला कामाचा मोबदला मिळत नसल्याने  साठवण बंधाराच्या  पाट्या टाकल्या जात नाहीत. मागील जून,जुलै महिन्यात तालुक्यात पाऊस न झाल्याने सर्वत्र पाणी टंचाई जानवू लागली होती मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला चांगला पावसाला झाल्याने तामसवाडी येथील धरण पूर्णता भरल्याने नदीत पाणी सोडण्यात आले आहे.मात्र  प्रशासनाच्या दिरंगाईमूळे नदी काठावरील फापोरे बु . कन्हेरे  फापोरे खु बिलखेडा या गावाना भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास  जबाबदार कोण असा प्रश्न गावातील नागरीकाना पडला आहे.

Protected Content